देशातील ‘कोरोना रूग्णांचे नॅशनल क्लिनिकल रजिस्टर बनवण्याची तयारी, पुण्यातील AFMC सह ‘या’ 15 संस्थांची निवड

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना दररोज कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. हे पाहता सरकार आता ठोस तयारी करत आहे. सरकार देशभरात दाखल कोरोना रूग्णांच्या संख्येची माहिती ठेवणार आहे. या अंतर्गत एक नॅशनल क्लिनिकल रजिस्टर बनवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यासाठी तयारीला लागली आहे. या कामासाठी देशभरातील पंधरा राष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांची निवड करण्यात आली असून यामध्ये पुण्यातील एका केंद्रीय संस्थेची निवड करण्यात आली आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील हॉस्पीटलमध्ये दाखल कोरोना रूग्णांचा रियल टाइम डाटा एकत्र करण्यासाठी असे केले जात आहे, ज्यामुळे उपचारांचे परिणाम आणखी चांगले करणे, महामारीच्या संसर्गाचे विश्लेषण करणे आणि त्याविरूद्ध प्रतिक्रिया करण्यात मदत होणार आहे.

आरोग्य मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एआयआयएमएस) सहकार्याने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), नॅशनल क्लिनिकल रजिस्टर स्थापन करण्याची योजना बनवत आहे, ज्यामुळे संशोधक आणि धोरण आखणार्‍यांना कोरोना रूग्णांच्या उपचारात सुधारणेसाठी, तपासणी आणि उपचारांची प्रभावशीलता, प्रतिकूल प्रभाव पडणे आणि पुरावे उत्पन्न करण्यात मदत होणार आहे.

अधिकार्‍यांनी म्हटले की, याचा उद्देश हॉस्पीटलमध्ये भरती कोरोना रूग्णांशी संबंधीत माहिती, जसे की, डाटा क्लिनिकल आणि प्रयोगशाळा सुविधा, त्यांची संख्या, मृत्यू संख्या, उपचाराचे परिणाम, अन्य लोकांमध्ये सर्व वयोगटातील गुंतागुंत एकत्र करणे इत्यादीचा समावेश आहे. त्यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणार्‍या आजाराचे अनेक पॅरामीटर आहेत, जे आजाराचे योग्य निदान आणि व्यवस्थापनात अडथळा आहेत.

एका अधिकार्‍याने सांगितले की, देशाच्या विविध क्षेत्राला कव्हर करणारा एक व्यवस्थित डाटाबेस, हा महामारीच्या प्रगतीच्या प्रवृत्तीचा शोध घेणे आणि त्यानुसार महामारीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या निकालाबाबत जाणून घेण्यासाठी, कोरोनाची महत्वपूर्ण माहिती सूचित करण्यासाठी संशोधकांना आणि धोरण निर्मात्यांना सक्षम करेल,

या कामासाठी देशात 15 संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये चंदीगढमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआएमईआर), एआयआयएमएस, दिल्ली, एआयआयएमएस जोधपुर, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायंन्सेस (एनआयएमएचएएनएस), बेंगळुरु आणि आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे (एएफएमसी) सह राष्ट्रीय ख्यातीच्या पंधरा संस्थांचा सहभाग आहे. या सर्व संस्था देशभरातील हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजांसोबत मिळून हे काम पूर्ण करतील.