Coronavirus in india | देशात गेल्या 24 तासात 33 हजार 376 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coronavirus in India | मागील दिड वर्षापासुन कोरोनाच्या (Coronavirus in India) धास्तीने अनेक लोक हतबल झाले आहे. कोरोनाच्या विषाणुने अनेकांच्या संसारावर गदा आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट भारतात अधिक जलदतेने फोफावली. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येत आहे, बाधितांचा आकडा कमी-जास्त होत असला तरी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) आकडेवारीवरुन बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

देशात मागील 24 तासात 33 हजार 376 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. म्हणुन आता उपचाराखाली असलेल्या बाधितांचा आकडा 3 लाख 91 हजार 516 इतकी आहे. तसेच, काल (शुक्रवारी) दिवसभरात 32 हजार 198 रुग्णांनी कोरोना विषाणुवर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 कोटी 23 लाख 74 हजार 497 वर पोहोचली आहे. भारतात रुग्ण ठिक होण्याचे प्रमाण आता 97.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, मागील दिड माहिन्यापासुन रुग्ण ठिक होण्याचा प्रमाण दर सातत्याने 3 टक्क्यांच्या खालीच आहे.

दरम्यान, भारतात काल (शुक्रवारी) दिवसभरात 308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
म्हणुन कोरोना आजारामुळे मृत्यु झालेल्यांचा एकुण आकडा 4 लाख 42 हजार 317 वर पोहोचला आहे. तसेच कोरोनापासुन बचाव करण्यासाठी सरकारने भारतातील नागरीकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) उपलब्ध करुन दिली आहे. लस घेतलेल्या एकूण नागरीकांची संख्या आता 73 कोटी 5 लाख 89 हजार 688 वर पोहोचली आहे.

Web Titel :- Coronavirus in India | india reports 33376 new covid19 cases 32198 recoveries

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Vijay Rupani Resigns | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

Devendra Fadnavis | फडणवीसांचा सरकारला सवाल; म्हणाले – ‘कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का?’

Nagpur News | दुर्देवी ! मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी