Coronavirus In India : देशात ‘कोरोना’ची प्रकरणे 78 लाखांच्या पुढे, 24 तासात 53,370 नवे पॉझिटिव्ह, 7 लाखांपेक्षा कमी अ‍ॅक्टिव्ह केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात शनिवारी कोराना व्हायरसची 54,000 पेक्षा जास्त प्रकरणे आली आणि सुमारे 650 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर 65,000 पेक्षा जास्त लोक बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकड्यांनुसार, शुक्रवारी सकाळी 8 वाजतापासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 53,370 नवी प्रकरणे आली.

मंत्रालयाने म्हटले की, ते आपल्या आकड्यांची पडताळणी आयसीएमआरशी करत आहेत. सध्या देशात 6,80,680 लोक कोरोनाने संक्रमित आहेत. तर डिस्चार्ज मिळालेल्या लोकांची संख्या 70,16,046 आणि मृतांची संख्या 1,17,956 आहे. मागील 24 तासात जेथे अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 14,829 ने कमी झाली आहे तर 67,549 लोक बरे झाले आहेत. यासोबतच या काळात 650 लोकांचा मृत्यू झाला आहे.

यासोबतच आयसीएमआरने म्हटले की, शुक्रवारी 12 लाख 69 हजार 479 लोकांचे सॅम्पलिंग झाले. तर 23 ऑक्टोबरपर्यंत 10 कोटी 13 लाख 82 हजार 564 लोकांची तपासणी झाली आहे. चेहषुने सांगितले की, सध्या देशात 8.96 टक्के केस अ‍ॅक्टिव्ह आहेत. तर 89.53 टक्के लोक बरे झाले आहेत. तसेच 1.51 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 78 लाख 14 हजार 682 प्रकरणे आहेत.

महाराष्ट्रात 7,347 नवी प्रकरणे
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची 7,347 नवी प्रकरणे समोर आली, ज्यामुळे राज्यात शुक्रवारी एकुण प्रकरणे वाढून 16,32,544 झाली आहेत. राज्याच्या आरोग्य अधिकार्‍याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एक दिवसात राज्यात कोविड – 19 मुळे आणखी 184 रूग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यात एकुण मृतांची संख्या वाढून 43,015 झाली आहे.

अधिकार्‍याने सांगितले की, 13,247 रूग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला, ज्यामुळे राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 14,45,103 झाली आहे. राज्यात सध्या 1,43,922 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत 1,470 नवी प्रकरणे
शुक्रवारी राज्याची राजधानी मुंबईत कोरोना व्हायरस संसर्गाची 1,470 नवी प्रकरणे समोर आली आणि आणखी 48 रूग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच मुंबईत एकुण प्रकरणांची संख्या वाढून 2,48,802 झाली आणि एकुण मृतांची संख्या वाढून 10,009 झाली.

You might also like