Coronavirus in India : भारतात ‘कोरोना’च्या रूग्णांमध्ये घट कायम, 24 तासात 55 हजार नवीन केस, 702 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे सापडण्याचा वेग तपासण्यांच्या सापेक्ष कमी होत आहे. बुधवार ते गुरूवारपर्यंत 24 तासांच्या कालावधीत देशात 50,000 पेक्षा जास्त प्रकरणे आली. मात्र, मृतांची संख्या अजूनही 500 पेक्षा जास्त प्रतिदिनचा आकडा पार करत आहे. तर संसर्गातून बरे होणारे आणि डिस्चार्ज करण्यात येणार्‍यांची संख्या सुद्धा रोज 60,000 पेक्षा जास्त आहे.

बुधवारी सकाळी 8 वाजतापासून गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या दरम्यान देशात 55,839 नवी प्रकरणे समोर आली आणि 702 लोकांचा मृत्यू झाला. तर या दरम्यान 79, 415 लोक बरे झाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, मृतांमध्ये 70 टक्के लोक अन्य कोणत्यातरी आजाराने ग्रस्त होते. मंत्रालय आपल्या आकड्यांची पडताळणी आयसीएमआरच्या आकड्यांशी करत आहे.

एमओएचएफडब्ल्यूने सांगितले की, देशात सध्या अ‍ॅक्टिव्ह केस 7,15,812 , डिस्चार्ज किंवा बरे झाले 68,74,518 आणि मृतांची संख्या 1,16,616 आहे. 9.29% केस अ‍ॅक्टिव्ह, 89.20 टक्के केस डिस्चार्ज किंवा बरे झाले आहेत. तर 1.51 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची एकुण 77,06,946 प्रकरणे समोर आली आहेत.

महाराष्ट्रात 8,142 नवी प्रकरणे
महाराष्ट्रात एका दिवसात कोरोना व्हायरस संसर्गाची 8,142 नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे बुधवारी राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून 16,17,658 झाली. राज्याच्या आरोग्य अधिकार्‍याने ही महिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात संसर्गाने 180 लोकांचा मृत्यू झाला, ज्यानंतर कोरोना व्हायरसमुळे जीव गमावणार्‍यांची संख्या वाढून 42,633 झाली आहे.

उपचारानंतर 23,371 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ज्यानंतर बरे होणार्‍यांची संख्या वाढून 14,15,679 झाली आहे. राज्यात 1,58,852 रूग्णांवर संसर्गाचा उपचार सुरू आहे.

You might also like