Coronavirus : दिलासादायक ! देशात पहिल्यांदाच 4 लाखांहून अधिक रुग्ण झाले ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात काही दिवसापासून कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. मात्र आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. देशात पहिल्यांदाच चार लाखाहून अधिक रुग्ण कोरोनमुक्त झाल्याचे समोर आले आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णाची संख्या तीन लाखाच्या आत नोंदवण्यात आली.

दरम्यान गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ४ हजार ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत होती त्या प्रमाणात दोन महिन्यांनंतर आता अडीच लाखाच्या जवळपास नवे रुग्ण नोंदविले आहेत. यापूर्वी २० एप्रिलला २ लाख ५९ हजार नवे रुग्ण नोंदविण्यात आले होते. मात्र काही राज्यांमध्ये बाधितांचा आलेख अजून चढताच आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ व पुदुच्चेरीमध्ये या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय ओडिशा, आंध्र प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे.

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराखाली
आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ससंसर्गाचे प्रमाण अधिक होते. मुंबईत पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे.मंगळवारी महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात २ कोटींचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. साेमवारी राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९ हजार ६९९ नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले आहे.