दिलासादायक ! भारतातील कोरोना संक्रमणाचा वेग घसरतोय, जाणून घ्या गेल्या 24 तासातील आकडेवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत देशात रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने चढउतार पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन कोरोना (Corona) रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 32 हजार 788 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्येत घट होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. देशभरात गेल्या 24 तासात 3207 कोरोना Corona रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Diabetes In Children : कोविडमुळे होत आहे डायबिटीज, मुलांमध्ये सुद्धा हा धोका आला समोर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 32 हजार 788 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 2 लाख 32 हजार 456 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी सोमवारी 1 लाख 27 हजार 510 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 2795 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सलग विसाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

फायद्याची गोष्ट ! फक्त 5 हजार गुंतवून 50 हजार कमवण्याची संधी ! सुरू करा ‘हा’ बिझनेस, मोदी सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

देशभरात आतापर्यंत 2 कोटी 83 लाख 7 हजार 832 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 2 कोटी 61 लाख 79 हजार 85 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत 3 लाख 35 हजार 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 17 लाख 93 हजार 645 सक्रिय रुग्ण आहेत. तर 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 जणांनी कोरोनावरील लस घेतली आहे.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून