Coronavirus : देशात ‘कोरोना’बाधितांची संख्या 11000 च्या वर, आतापर्यंत 377 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना व्हायरस संसर्गामुळे होणाऱ्या मृतांची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत ३७७ लोकांचा मृत्यू झाला असून संक्रमित लोकांची संख्या ११,४३९ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग झालेल्यांपैकी किमान १,३०५ लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे तर ९,७५६ लोक अद्याप उपचार घेत आहेत. त्यापैकी ७६ विदेशी नागरिक आहेत.

मंगळवारी सायंकाळपासून या विषाणूमुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली येथील प्रत्येकी दोन लोकांसह कर्नाटक आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात बळी पडलेल्या ३७७ लोकांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १७८, मध्य प्रदेशात ५०, दिल्लीत ३०, गुजरातमध्ये २८, तेलंगणात १७, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये आतापर्यंत १२-१२, कर्नाटकमध्ये १०, आंध्र प्रदेशात ९, पश्चिम बंगालमध्ये ७, जम्मू-काश्मीरमध्ये ४, हरियाणा आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३, झारखंडमध्ये २, तसेच बिहार, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि आसाममध्ये आतापर्यंत या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी विविध राज्यात कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा कमीतकमी ३८९ होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा डेटा आणि विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत फरक आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा फरक केवळ डेटा अपडेट करण्यास उशीर झाल्यामुळेच होतो. आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक २६८७ रुग्णांची नोंद झाली, त्यानंतर दिल्लीत १,५६१ आणि तामिळनाडूमध्ये १,२०४ रुग्ण आढळले. राजस्थानमध्ये ९६९, मध्य प्रदेशात ७३०, उत्तर प्रदेशात ६६०, गुजरातमध्ये ६५०, तेलंगणात ६२४, आंध्र प्रदेशात ४८३, केरळमध्ये ३८७ प्रकरणाची नोंद आहे.

तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये २७८, कर्नाटकमध्ये २६०, पश्चिम बंगालमध्ये २१३, हरियाणामध्ये १९९, पंजाबमध्ये १७६, बिहारमधील ६६, ओडिशामध्ये ६०, उत्तराखंडमध्ये ३७, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ३३-३३, आसाममध्ये ३२, झारखंडमध्ये २७, चंडीगडमध्ये २१, लडाखमध्ये १७ प्रकरणे नोंदली गेली. तसेच अंदमान निकोबार बेटांमध्ये ११, गोवा आणि पुडुचेरीमधील प्रत्येकी सात, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी दोन आणि मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी एक प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच ज्या जिल्हा किंवा क्षेत्रात कोरोना रूग्ण समोर आलेला नाही तेथे २० तारखेनंतर काही बाबतींत सूट देण्यात येणार आहे.