Coronavirus : ‘कोरोना’चे भारतात आतापर्यंत 59 प्रकरणं, केरळमध्ये सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा धोका देशात सतत वाढत चालला आहे. बुधवारी सकाळी भारतात कोरोना व्हायरसच्या केसेसची संख्या 59 झाली आहे. मागील तीन दिवसात ही प्रकरणे जास्त वाढली आहेत. सर्वात जास्त परिणाम केरळात दिसून येत आहे. केवळ मंगळवारीच केरळात 10 पेक्षा जास्त कोरोना व्हायरसच्या केसेस समोर आल्या. भारतात आतापर्यंत कोणत्या भागात कोरोना व्हायरसच्या किती केसेस समोर आल्या, यावर एक नजर टाकूयात…

* महाराष्ट्र – 5

* केरल – 14

* कर्नाटक – 4

* तमिळनाडु – 1

* राजस्थान – 3

* तेलंगाना – 1

* पंजाब – 1

* जम्मू – 1

* लडाख – 2

* दिल्ली-एनसीआर – 6

* गुरुग्राम – 14

* उत्तर प्रदेश – 7

सरकारने सतर्कता वाढवली

केंद्र सरकार कोरोना व्हायरसबाबत लागोपाठ सतर्कता वाढवत आहे. एयरपोर्टवरसुद्धा अंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्क्रीनिंग केली जात आहे, त्यानंतरच भारतात प्रवेश दिला जात आहे. सरकारने दिलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत एयरपोर्टवर 6 लाखपेक्षा जास्त लोकांची स्क्रीनिंग झाली आहे.

तर, दिल्लीत सुद्धा यास तोंड देण्यासाठी जोरात तयारी सुरू आहे. दिल्लीत काही हॉस्पिटल ठरविण्यात आली आहेत, जेथे कोरोनाच्या संशयित रूग्णांना दाखल करण्यात येत आहे. दिल्लीत लागोपाठ मेट्रो आणि बसेसची स्वच्छता केली जात आहे.

देशात आतापर्यंत कोरोना व्हायरस चेकअपच्या एकुण 49 लॅब तयार करण्यात आल्या आहेत, ज्या देशातील विविध भागात आहेत. येथे चेकिंग झाल्यानंतर रूग्णाच्या कोरोना व्हायरसचा संसर्गाला दुजोरा दिला जात आहे. जगभरात कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची संख्या 4000 च्या पुढे गेली आहे.