Coronavirus In India Updates : ‘कोरोना’चे आकडे भयावह ! ‘या’ राज्यांमधील परिस्थिती अतिशय गंभीर, जाणून घ्या गेल्या 24 तासातील आकडे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या कोरोना विषाणूच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत एकूण 3,95,048 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. आतापर्यंत 2,13,831 लोक उपचारादरम्यान बरे झाले आहेत. त्याच वेळी, कोरोनामुळे 12948 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत 1,68,269 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाची एकूण 14,516 प्रकरणे नोंदली गेली असून 375 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली गेली आहे. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात भयानक आकडेवारी आहे.

जर राज्यांच्या आकडेवारीबद्दल आपण चर्चा केली तर अंदमान निकोबारमध्ये 45 लोक संक्रमित सापडले आहेत, दादर नगर हवेली आणि दमन दीवमध्ये 62 संक्रमित, चंदीगडमध्ये 381 संक्रमित तर 6 मृत्यू, राजधानी दिल्लीत 53,116 संक्रमित तर 2035 जणांचा मृत्यू, गोवामध्ये 725 संक्रमित, आंध्र प्रदेशात 7061 संक्रमित तर 96 जणांचा मृत्यू, तर अरुणाचल प्रदेशात 103 संक्रमित, आसाममध्ये 4904 संक्रमित तर 9 लोकांचा मृत्यू, बिहारमध्ये 7181 संक्रमित तर 50 जणांचा मृत्यू, छत्तीसगडमध्ये 2028 संक्रमित तर 10 मृत्यू, गुजरातमध्ये 26,141 संक्रमित तर 1618 मृत्यू, हरियाणामध्ये 9743 संक्रमित तर 144 मृत्यू, हिमाचल प्रदेशात 619 संक्रमित तर 8 मृत्यू, जम्मू-काश्मीरमध्ये 5680 संक्रमित तर 75 लोकांचा मृत्यू झाला आहे.

उर्वरित राज्यांविषयी बोलायचे झाले तर महाराष्ट्रात 124331 संक्रमित तर 5893 मृत्यू झाला, मध्य प्रदेशात 11,582 संक्रमित तर 495 मृत्यू, तामिळनाडूमध्ये 54449 संक्रमित तर 666 मृत्यू, राजस्थानात 14,156 संक्रमित तर 333 मृत्यू, झारखंडमध्ये 1965 संक्रमित तर 11 जणांचा मृत्यू, कर्नाटकमध्ये 8281 संक्रमित तर 124 जणांचा मृत्यू, केरळमध्ये 2912 संक्रमित तर 21 जणांचा मृत्यू, लडाखमध्ये 744 संक्रमित तर 1 मृत्यू, मणिपूरमध्ये 681 संक्रमित, मेघालयात 44 संक्रमित तर 1 मृत्यू, मिझोरममध्ये 130 संक्रमित, नागालँडमध्ये 198 संक्रमित, ओडिशात 4677 संक्रमित तर 11 मृत्यू, पुडुचेरीमध्ये 286 संक्रमित तर 7 मृत्यू, पंजाबमध्ये 3832 संक्रमित तर 92 मृत्यू, सिक्कीममध्ये 70 संक्रमित, तेलंगणामध्ये 6526 संक्रमित तर 198 मृत्यू, त्रिपुरामध्ये 1178 संक्रमित तर 1 मृत्यू, उत्तराखंडमध्ये 2177 संक्रमित तर 26 मृत्यू, उत्तरप्रदेशात 15,785 संक्रमित तर 488 मृत्यू, पश्चिम बंगालमध्ये 13,090 संक्रमित तर 529 लोकांचा मृत्यू झाला आहे.