Coronavirus : देशभरात कोरोना फोफावतोय, ‘हे’ आहेत हेल्पलाइन नंबर, घ्या काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा प्रभाव वाढत आहे. जवळपास देशातील १५ राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. आज सोमवारी ओडिशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तर आज महाराष्ट्रात अजून ५ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यामुळे ही संख्या आता ३८ वर पोहोचली आहे. संपूर्ण भारताचा विचार केला तर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत.

आज महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे नवीन ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईत ३, नवी मुंबईत १ आणि यवतमाळमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. दरम्यान खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

helpline number

संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात कोरोना विषाणूची सर्वात जास्त संख्या आढळून आली आहे. महाराष्ट्रानंतर केरळमध्ये कोरोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये आतापर्यंत जवळपास २३ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच उत्तर प्रदेशात १२, दिल्लीत ७, कर्नाटकात ६, तेलंगणात ३, राजस्थानमध्ये २, जम्मू-काश्मीरमध्ये २, तामिळनाडूत १, आंध्रप्रदेशात १ असे देशभरात रुग्ण आढळून आले आहेत, तर कर्नाटक आणि दिल्लीत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.