Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात (Coronavirus) कोरोनाच्या ग्राफमध्ये घसरण सुरू आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाची 131,371 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर, या दरम्यान 2,706 लोकांचा मृत्यू (Death corona ) झाला आहे. मात्र, नवीन प्रकरणे आणि लोकांचा मृत्यू ( Death corona)च्या आकड्यात गुरुवारी जारी संख्येच्या तुलनेत घट झाली आहे.

ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

गुरुवारच्या तुलनेत कमी आकडे
गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी कोरोना ( Coronavirus ) च्या आकड्यांनुसार 1,34,154 नवी प्रकरणे आणि 2,887 मृत्यू नोंदले गेले होते.
तिकडे दिल्लीत कोरोनाच्या नवीन प्रकरणांची संख्या मोठा दिलासा देत आहे.
}तर 24 तासात 487 नवीन केस समोर आल्या आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा आकडे कमी होत आहेत.

गरीब आणि वंचितांसाठी चालणार मोदी सरकारचे विशेष अभियान, बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

7 मे च्या पीकनंतर कमी होत आहेत केस
भारतात कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांची संख्या कमी होत आहे.
दुसर्‍या लाटेत 7 मे रोजी पीकनंतर केस सतत कमी होत आहेत आणि अ‍ॅक्टिव्ह केसचा लोक सुद्धा कमी होत आहे.
देशात अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 17,13,413 आहे, जी एकुण प्रकरणांच्या 6.02 टक्के आहे.

मृत्यूंची संख्या जास्तच
पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा मागील 10 दिवसांपासून 10 टक्केच्या खाली आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सध्या 7.66 टक्के आहे.
मात्र, संसर्गाने मृत्यूची संख्या अजूनही 3,000 च्या जवळ नोंदली जात आहेत.

तमिळनाडुत सर्वात जास्त केस
तमिळनाडुत संसर्गाच्या सर्वात जास्त 25,317 नवीन केस आल्या आहेत.
त्यानंतर केरळात 19,661, कर्नाटकमध्ये 16,387, महाराष्ट्रात 15,169 आणि आंध्र प्रदेशात 12,768 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

दिल्लीत 487 नवीन प्रकरणे
मागील 24 तासात दिल्लीत 487 नवीन प्रकरणे समोर आली.
तर 45 लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीत पॉजिटिव्हिटी रेट 0.61% आहे.
तर यूपीमध्ये रिकव्हरी रेट 97.3% झाला आहे. पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.4% झाला आहे.

महाराष्ट्रात कमी होत आहेत केस
महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या केस कमी होत आहेत. काल 15 हजारपेक्षा जास्त केस होत्या.
तर 25 हजारपेक्षा जास्त लोक बरे झाले. मात्र, अनलॉकबाबत महाराष्ट्रात संभ्रम आहे.
काँग्रेसचे मंत्री आणि सीएम वेगवेगळं बोलत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी म्हटले पाच लेव्हलवर अनलॉक केले जाईल.
परंतु याच्या काही वेळानंतर सीएम उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, कोणतीही सूट दिली जाणार नाही.
नव्या प्रस्तावावर सध्या विचार केला जात आहे.