Coronavirus : देशात ‘कोरोना’चा हाहाकार सुरूच ! गेल्या 24 तासात 34884 नवे पॉझिटिव्ह तर 671 जणांचा मृत्यू 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे सतत वाढत आहेत. शनिवारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Mohfw) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाची प्रकरणे जवळपास साडे दहा लाखपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गेल्या २४ तासांत म्हणजेच शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ दरम्यान ३४,८८४ नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर ६७१ लोकांचा मृत्यू झाला आणि १७,९९४ लोक बरे झाले. सध्या देशात एकूण संक्रमितांची संख्या १०,३८,७१६ आहे, तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,५८,६९२ आहे, तर ६,५३,७५० रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे. या व्यतिरिक्त कोविड-१९ संसर्गामुळे गेल्या २४ तासांत ६७१ जणांनी जीव गमवला, ज्यामुळे देशात मृतांची संख्या २६,२७३ झाली आहे.

Mohfw ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रिकव्हरी रेट ६३.३ वरुन ६२.९ वर आला आहे. त्याचबरोबर जगभरात भारतात मृत्यूचे प्रमाण २.५ टक्के आहे, तर संपूर्ण जगात कोरोना संसर्ग मृत्यू दर ४.२२ आहे. या दरम्यान आंध्र प्रदेशात गेल्या २४ तासांत २६०२ प्रकरणे आढळली, त्यानंतर येथील संख्या ४० हजारांवर गेली.

काल ३.६ लाख चाचण्या घेण्यात आल्या, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. गुरुवारपेक्षा शुक्रवारी २७,८०० जास्त चाचण्या घेण्यात आल्या, त्यानंतर एकूण चाचण्या १.३४ कोटी झाल्या. चाचणीच्या बाबतीत भारत सध्या जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

उत्तर प्रदेशात १९१९ नवीन प्रकरणे 

आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाची १९१९ प्रकरणे आढळली आहेत, तर शुक्रवारी आणखी ३८ लोकांच्या मृत्यूसह मृतांची संख्या १०८४ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने सायंकाळी उशिरा जाहीर केलेल्या बुलेटिनमध्ये सांगितले गेले की, राज्यात गेल्या २४ तासांत १९१९ प्रकरणे समोर आली आहेत, तर कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढून १०८४ झाली आहे. राज्यात कोरोनाची एकूण ४५,३६३ प्रकरणे आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव वैद्यकीय व आरोग्य- अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, सध्या राज्यात संसर्गजन्य रुग्णांची संख्या १६,४४५ आहे. त्यांनी सांगितले की २७,६३४ लोकांवर पूर्णपणे उपचार केले गेले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात कोविड-१९ ची ८३०८ प्रकरणे, २५८ लोकांचा मृत्यू 

महाराष्ट्रात एका दिवसात कोविड-१९ ची ८३०८ नवीन प्रकरणे आढळल्यानंतर शुक्रवारी राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या २,९२,५८९ वर गेली. आरोग्य विभागाने ही माहिती दिली. एका दिवसात कोविड-१९ चे आठ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळण्याची राज्यात ही तिसरी वेळ आहे. गुरुवारी एका दिवसात राज्यात सर्वाधिक ८,६४१ नवीन रुग्ण आढळले होते, तर ११ जुलै रोजी ८,१३९ संक्रमित आढळले होते. शुक्रवारी आरोग्य विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी कोविड-१९ मुळे २५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांचा आकडा ११,४५२ झाला.

या बरोबरच मिझोरममध्ये नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) च्या चार जवानांसह १० जण कोरोना संक्रमित आढळले आहेत. यासह शनिवारी ईशान्य राज्यात संक्रमणाची प्रकरणे वाढून २८२ झाली. एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, पाच नवीन प्रकरणे आयजोलमधून, तीन सियाहा येथून आणि दोन चंफाई जिल्ह्यातील आहेत.

बिहारमध्ये आढळली १८०० प्रकरणे 

बिहारमध्ये कोविड-१९ मुळे आणखी चार जणांच्या मृत्यूनंतर शुक्रवारी मृतांची संख्या २०० च्या वर गेली. आरोग्य विभागाने सांगितले की, गेल्या २४ तासांत १८२५ नवीन प्रकरणे आढळली आहेत. सर्वाधिक १२२ नवीन प्रकरणे सिवान येथे आढळली आहेत. याशिवाय नालंदा येथे १०५, पाटणा येथे ९९, पश्चिम चंपारणमध्ये ९८ आणि मुंगेमध्ये ५८ प्रकरणे आढळली आहेत.

दुसरीकडे झारखंडमध्ये गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संक्रमणामुळे जमशेदपूर, हजारीबाग, गोड्डा आणि रामगडमध्ये १-१ मृत्यू झाला असून, ज्यामुळे राज्यात या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ४६ झाली आहे. याच दरम्यान कोरोना संक्रमणाची ३१३ नवीन प्रकरणे आढळली असून राज्यात कोविड-१९ संक्रमितांची एकूण संख्या ५०९६ वर गेली आहे.