Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,095 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. सोमवारी (दि.1) राज्यातील कोरोनाची आकडेवारी (Coronavirus in Maharashtra) हजाराच्या आली असताना आज यामध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर काल राज्यात 10 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली होती. मात्र, आज यामध्ये मोठी वाढ झाली आहे. रुग्ण वाढत असताना बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 15 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1078 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1095 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 53 लाख 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.59 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 48 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 274 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात (Coronavirus in Maharashtra) 15 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 28 लाख 43 हजार 792 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 12 लाख 965 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 497 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 919 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 1,095 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 54 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण ! आता 28024 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

Lok Sabha By-Election Results | दादरा-नगर हवेलीत भाजपला झटका ! शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय