Coronavirus : राज्यात शुक्रवारी 1089 नवीन ‘कोरोना’बाधित रुग्ण, महाराष्ट्रात बाधितांची संख्या 19 हजार ‘पार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल १ हजार ८९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोराना बाधितांची संख्या १९ हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यात १९ हजार ६३ रुग्ण झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार १४२ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईत ७४८ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. पुण्यात शुक्रवारी दिवसभरात ९९ रुग्ण आढळून आले असून एकूण २ हजार २४५ रुग्ण झाले आहेत.

राज्यात दिवसभरात ३७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून त्यात मुंबईतील २५ आणि पुण्यातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मुंबई, पुण्या पाठोपाठ आता ठाणे व परिसरातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. ठाणे मनपा ७२४, नवी मुंबई मनपा ७१६, कल्याण डोंबिवली मनपा २८४, मीरा भाईदर मनपा १९२, वसई विरार मनपा १९४, पनवेल मनपा १३२, मालेगाव ४५०, नाशिक मनपा ६०, जळगाव ८२, सोलापूर मनपा १७९, औरंगाबाद मनपा ४१८, अकोला मनपा ११२, अमरावती मनपा ७६, यवतमाळ ७६, नागपूर मनपा २१० कोरोना बाधित रुग्ण आहेत.

राज्यात आता वर्धा आणि गडचिरोली हे दोनच जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून तेथे एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. राज्यात शुक्रवारी १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३ हजार ४७० रुग्ण बरे झाले आहेत.