Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3033 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (सोमवार) मोठी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असून आज राज्यातील रुग्ण संख्या दोन हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात 1 हजार 736 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 3 हजार 033 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 04 लाख 320 रुग्णांनी (Coronavirus in Maharashtra) कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.34 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 578 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 32 हजार 115 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 03 लाख 03 हजार 740 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 79 हजार 608 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 38 हजार 474 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत.
तर 1,163 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 3033 ‘corona’ free in last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Taapsee Pannu | तापसी पन्नूच्या ‘रश्मि रॉकेट’मधील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणं झालं रिलीज (Video)

Bharti Vidyapeeth Recruitment-2021 | भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Band | नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं….’