Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,139 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus in Maharashtra) 2,219 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.38 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 49 कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 05 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा
नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 261 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 3,139 patients free of ‘corona’ in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RIL | रिलायन्सची जर्मनीच्या नेक्सवेफमध्ये (NexWafe) गुंतवणूक, डेन्मार्कच्या स्टीसडलसह (STIESDEL) सामरिक भागीदारी

Pune-Mumbai Sinhagad Express | सिंहगड एक्सप्रेस सोमवार पासून धावणार, 19 महिने होती बंद

Pune Corporation | महापालिकेच्या व्यावसायीक मिळकतींचा भाडेदर 2.5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढविला; पाचपट भाडेवाढीमुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी