Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,233 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra |राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (सोमवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (c) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 2 हजार 740 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 3 हजार 233 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 09 लाख 021 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.05 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 38 हजार 169 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 49 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 60 लाख 88 हजार 114 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 617 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 99 हजार 192 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,883 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 3,233 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Saki Naka Rape Case | साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले – मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे

Beed Crime | मुलाच्या नोकरीसाठी पतीची केली हत्या; प्रियकराच्या मदतीनं पत्नीचं फिल्मी स्टाइल कृत्य

Central Railway News | मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्काराने सत्कार