Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,313 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन राज्यात आज (शुक्रवार) 04 हजार 313 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 04 हजार 360 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 86 हजार 345 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.04 टक्के झाला आहे. आज 92 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 37 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका (Coronavirus in Maharashtra) झाला आहे.

राज्यात सध्या 50 हजार 466 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 44 लाख 87 हजार 950 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 64 लाख 77 हजार 987 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 02 लाख 98 हजार 098 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 1 हजार 954 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 244 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 205 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात कोरोना बाधित 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.

– 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 496344.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2508.

– एकूण मृत्यू – 8940.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 484896.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 9011.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 152 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 155 रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू

– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 270110.

– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1424.

– एकूण मृत्यू – 4401.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 264545.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 3625.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 4,313 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याप्रकरणात महिलेचा जामीन फेटाळला, शेतातून भोपळे चोरल्याची तक्रार केल्यास अ‍ॅट्रॉसिटी लावण्यासह…

Nitin Landge Bribe Case | पिंपरी पालिकेतील स्थायी समितीवरील अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईबद्दल अजित पवार म्हणाले…

Nanded Crime | वडिलानेच आपल्या पोटच्या मुलीची केली 3 वेळा विक्री; नांदेड मधील धक्कादायक घटना