Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,456 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Coronavirus in Maharashtra |राज्यात आज (बुधवार) 04 हजार 456 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 04 हजार 430 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 77 हजार 230 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.03 टक्के झाला आहे. आज 183 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 37 हजार 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.12 टक्के आहे.

राज्यात सध्यात 51 हजार 078 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 41 लाख 54 हजार 890 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 64 लाख 69 हजार 332 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 02 लाख 90 हजार 427 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 071 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 292 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 189 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.

– 205 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 495878.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2363.

– एकूण मृत्यू – 8931.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 484584.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 10156.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 171 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 111 रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 2 जणांचा मृत्यू

– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 269758.

– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1361.

– एकूण मृत्यू – 4399.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 2642582.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6018.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 4,456 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा

Crime News | गर्लफ्रेंडला ‘वश’ करण्याचा मंत्र देण्याच्या नावावर मांत्रिकाने लावला 43 लाखांना चूना, पोलिसात तक्रार दाखल

Pune News | भारतीय दलित कोब्रा संघटनेच्यावतीने पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन