Coronavirus in Maharashtra |  राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,031 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Coronavirus in Maharashtra | राज्यात आज (बुधवार) 05 हजार 031 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 04 हजार 380 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 47 हजार 414 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.04 टक्के झाला आहे.

आज 216 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.12 टक्के आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 36 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मध्यंतरी मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते.
मात्र, निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्यात नवीन रुग्णांची संख्या वाढत असून मृतांचा आकडा देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात सध्यात 50 हजार 183 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 28 लाख 40 हजार 805 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी 64 लाख 37 हजार 680 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यात सध्या 02 लाख 98 हजार 264 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर 2 हजार 369 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 5,031 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | पुणे पोलिसांची सतर्कता ! मानासिक रुग्ण कुटुंबात सुखरुप परतला

Gold Price Update | सोन्याच्या खरेदीसाठी सध्या करू नका घाई, दिवाळीपर्यंत 45000 रुपयांपर्यंत येऊ शकतो भाव, जाणून घ्या कारण

BJP MLA Rahul Kul | भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई