Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 518 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 518 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून आले आहे. तर, 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 811 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 87 हजार 593 रुग्ण कोरोनामुक्त (Coronavirus in Maharashtra) झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72 टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात सध्या 6 हजार 853 रुग्ण सक्रीय (Active Patient) आहेत.

 

राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 1 लाख 41 हजार 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 61 लाख 46 हजार 544 जणांची कोरोना चाचणी (Corona test) करण्यात आली आहे. त्यापैकी 66 लाख 39 हजार 296 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 78 हजार 801 जण होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 893 रुग्ण वैद्यकीय संस्थेत (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

दरम्यान, राज्यात ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे (Omycron variant) रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईतही दोन रुग्ण आढळून आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षाय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. तर त्यासोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षाच्या व्यक्तीलाही नव्या विषाणूची लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 518 new corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena | शिवसेना यूपीएत सहभागी होणार? संजय राऊत घेणार राहुल-प्रियंका यांची भेट

Pune Crime | पुण्यात ‘या’ कारणामुळं झाला समीरवर बेछुट गोळीबार ! भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश, पोलिसांकडून एकाला अटक

Rajesh Tope | आता RTPCR चाचणी 350 रुपयांत, खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Banks Strike | खासगीकरणाविरोधात 2 दिवसांचा संप करणार बँक कर्मचारी, घरातून बाहेर पडण्यापूर्वी तारीख तपासा

Pune News | 1971 च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय ! शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता – मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन