Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 536 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. राज्यात आज (सोमवार) 536 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 853 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत राज्यात 64 लाख 82 हजार 493 रुग्णांनी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.7 टक्के आहे.

 

राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 962 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्याचा मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या (Active Patient) संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहींसा कमी झाला आहे.
सध्या राज्यात 7 हजार 854 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Coronavirus in Maharashtra)

 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 54 लाख 20 हजार 117 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 34 हजार 980 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.
सध्या राज्यात 85 हजार 800 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत.
तर 1028 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 536 new corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Atrangi Re | पतिच्या लग्नात सारा अली खानचा जबरदस्त डान्स, चित्रपटातील पहिलं गाणं ‘चका-चक’ प्रदर्शित

Pune Airport | पुणे विमानतळ 1 डिसेंबर पासून 24 X 7 सुरु राहणार

NCP MLA Babajani Durrani | आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान; उधाण, प्रचंड खळबळ