Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णांचा वाढता आलेख आता उतरणीला लागला आहे. मागील महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5 हजार 455 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus in Maharashtra)

 

राज्यात आज 14 हजार 635 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 26 हजार 868 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.34 टक्के झाले आहे. राज्यात आज 63 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 43 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 35 हजार 088 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 60 हजार 902 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 6 लाख 10 हजार 718 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

आज राज्यात 76 ओमायक्रॉनचे रुग्ण
राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली आहे.
आतापर्यंत 3531 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2353 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 1178 ओमायक्रॉनचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 5455 new patients of Corona in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा