Coronavirus In Maharashtra : नवी मुंबईच्या वृद्धाश्रमात कोरोनाची 56 प्रकरणे, 14 जणांची प्रकृती गंभीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईतील एका वृद्धाश्रमातील 56 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्धाश्रमात एकुण 61 लोक रहात आहेत, ज्यामध्ये 56 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 56 कोरोना संक्रमितांपैकी 14 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी राज्यात सर्वाधिक 68,631 प्रकरणे समोर आली होती. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. राज्यात संसर्गाची प्रकरणे वाढून 38,98,262 झाली, तर मृतांची संख्या 60,824 झाली आहे. राज्यात 6,76,520 उपचाराधीन प्रकरणे आहेत.

कल्याण जेलमधील 30 कैदी कोरोना संक्रमित
सोबतच ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील आधारवाडी जेलमधील किमान 30 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकार्‍याने सोमवारी सांगितले की, सध्या 1,800 पेक्षा जास्त कैदी जेलमध्ये बंद आहेत.

सर्व कैद्यांची नुकतीच चाचणी करण्यात आली होती आणि त्यामध्ये 30 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. सोमवारी त्यांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.