Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,269 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज (शनिवार) 06 हजार 269 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 07 हजार 332 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60 लाख 29 हजार 817 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.35 टक्के झाला आहे. आज 224 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 31 हजार 429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे (Coronavirus in Maharashtra) मृत्यू होण्याचे प्रमाण 2.1 टक्के आहे.

राज्यात सध्यात 93 हजार 479 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 66 लाख 44 हजार 448 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 62 लाख 58 हजार 079 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 05 लाख 27 हजार 754 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 621 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी


– दिवसभरात 181 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 331 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत 08 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03.

– 226 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 485466.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2875.

– एकूण मृत्यू – 8725.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 473866.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7620.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 156 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 164 रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 2 जणांचा मृत्यू

– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 263306.

– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1073.

– एकूण मृत्यू – 4331.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 257902.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4130.

Web Title :-  Coronavirus in Maharashtra | 6,269 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Promotion to Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती, पुण्यातील 22 जणांचा समावेश; गृह विभागाने काढला अध्यादेश

Sunny Leone | सली लिओनी, रतन टाटांच्या नावानं मुंबईत फिरतेय गाडी; मुंबई पोलिसांकडून 17 जणांवर FIR