Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,843 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी (Coronavirus in Maharashtra) झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या सात हजारांच्या आत येऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरु लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात आज 5,212 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) मिळाला आहे. तर 6,843 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 94 हजार 985 इतकी आहे. याच दरम्यान राज्यात 123 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 62 लाख 64 हजार 922 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 60 लाख 35 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.33 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.09 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 05 लाख 17 हजार 562 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 3 हजार 506 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 250 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 327 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03.
– 231 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 485716.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2792.
– एकूण मृत्यू – 8731.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 474193.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6987.

 

पिंपरी चिंचवडमधील (PCMC) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 165 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 174 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 263471.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 1062.
– एकूण मृत्यू – 4333.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 258076.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 3822.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 6,843 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPL 2021 | UAE मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार पहिला सामना, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार आयपीएलची दुसरी फेज; जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

Mumbai Police Recruitment 2021 | मुंबई पोलीस दलात विधि अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख