Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 707 नवीन रुग्ण, ‘ओमायक्रॉन’च्या रूग्ण संख्येत वाढ; जाणून घ्या इतर आकडेवारी

Advt.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत काहींसा चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यातच राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. राज्यात रविवारी (दि.5) पुण्यातील एक आणि पिंपरी चिंचवडमधील सहा रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, आज राज्यात 707 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 86 हजार 782 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के इतके झाले आहे.

 

राज्यात आज 07 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के असून हा दर मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे. सध्या राज्यात 7 हजार 151 रुग्ण अॅक्टिव्ह (Active Patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात (Coronvirus in Maharashtra) आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 60 लाख 78 हजार 616 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 38 हजार 778 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे. सध्या राज्यात 78 हजार 858 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत. तर 916 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 707 new patients of Corona in the last 24 hours in the state, increase in the number of patients of omicron covid variant; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

DGP Sanjay Pandey | परमबीर सिंह हे व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत, DGP संजय पांडेंचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

दिलासादायक ! ESIC च्या दोन मोठ्या योजनांच्या अटीत शिथीलता, हजारो लोकांना होणार फायदा; जाणून घ्या

Hair Care Tips | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून नष्ट करेल ‘ही’ गोष्ट; केस होतील काळे, दाट आणि मजबूत

Rupali Chakankar | …तर सरपंचपद धोक्यात येणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस

Multibagger Penny Stock | रू. 1.18 चा Stock झाला रू. 78 चा, एका वर्षात 1 लाख रुपये झाले 66 लाख, तुमच्याकडे आहेत का?

Omicron Covid Variant in Pune | चिंताजनक ! पुण्यात ‘ओमायक्रॉन’चा शिरकाव; पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यातील एका रूग्णाला Omicron ची लागण (व्हिडिओ)

Pune Crime | एक्सर्बिया डेव्हलपर्सकडून 45 लाखांची फसवणूक ! कंपनीचे संचालक विशाल नहार, राहूल नहार, सचिन पाटील, नितीन सैद यांच्यावर FIR