Coronavirus : ‘कोरोना’चा महाराष्ट्रात उद्रेक ! गेल्या 24 तासात उच्चांकी 7074 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 2 लाख पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येने हादरून गेला आहे. 24 तासात राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहे. राज्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये जर्मनीला देखील मागे टाकले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 200064 वर गेली आहे. आज राज्यात 295 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 8671 वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची संख्या 83237 वर गेली आहे. मुंबईत कोरोनामुळे 4830 जणांचा मृत्यू झाला आहे. आज नवे रुग्ण,मृत्यूची संख्या आणि एकूण संख्या या तिनही गोष्टींमध्ये विक्रमी वाढ झाली असून प्रशासन आणि सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासात 3395 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 108082 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात सध्या 83295 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.