Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 7,120 ‘कोरोना’मुक्त; 6,695 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 7 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (गुरुवार) घट झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत असताना दुसरीकडे मृत्यूंचा (Death) आकडा कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे.

राज्यात आज 6,695 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7,120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 61 लाख 24 हजार 278 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.66 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 120 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.1 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 74 हजार 995 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 1 लाख 33 हजार 530 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 89 लाख 62 हजार 106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 36 हजार 220 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 4 लाख 46 हजार 501 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,776 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 7,120 ‘corona’ free in the last 24 hours in the state; 6,695 new patients; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh | सीबीआयला राज्य सरकार सहकार्य करत नाही, अधिकाऱ्याला सहाय्यक पोलिस आयुक्त धमकावतात

Maruti Suzuki च्या ‘या’ कारच्या प्रेमात पडला संपूर्ण देश, जोरदार होत आहे खरेदी – पहा तिची वैशिष्ट्य

Pune Corporation | अखेर ‘स्वच्छ’ संस्थाच पुणे महापालिकेच्या मदतीला धावून आली; पालिकेच्या विनंतीवरून नव्याने समाविष्ट गावातील कचर्‍याचे विलगीकरण केले सुरू