Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 730 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज (रविवार) वाढ झाल्याचे दिसत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज कमी झाली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. आज राज्यात कोरोनाचे (Coronavirus in Maharashtra) 845 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 730 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

 

 

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 75 हजार 682 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.67 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे.

 

सध्या राज्यात 9 हजार 799 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 46 लाख 87 हजार 403 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 29 हजार 875 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 97 हजार 482 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,019 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 730 patients ‘corona’ free in last 24 hours in the state, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा