Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7,302 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 10 हजारांच्या खाली आला आहे. आज 7,302 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (new patient) नोंद झाली आहे. तर आज 7,756 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज (discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची (Recover patient) संख्या आता 60 लाख 16 हजार 506 इतकी झाली आहे. आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात सध्या 94 हजार 168 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active) आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रामाण (Recovery Rate) 96.34 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 62 लाख 64 हजार 059 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी (Laboratory sample) 62 लाख 45 हजार 057 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 872 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 3 हजार 743 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 333 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 187 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.
– 224 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 485035.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3007.
– एकूण मृत्यू – 8715.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 473313.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7791.

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 170 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 191 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 262999.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1095.
– एकूण मृत्यू – 4325.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 257579.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4709.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 7,302 new corona patients in the last 24 hours in the state; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे