Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 7,431 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (शुक्रवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या मात्र आज वाढली आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत असताना दुसरीकडे मृत्यूंचा (Death) आकडा वाढताना दिसत असल्याने राज्यासाठी (Coronavirus in Maharashtra) ही चिंताजनक स्थिती आहे.

राज्यात आज 6,600 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7, 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.61 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 231 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.1 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 77 हजार 494 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 32 हजार 566 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 77 लाख 60 हजार 862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 96 हजार 756 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
महाराष्ट्रत सध्या 4 लाख 79 हजार 553 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 3,289 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 7,431 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Transfer | राज्यातील 14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रताप जाधव यांची ‘यशदा’च्या उप महासंचालक पदी नियुक्ती

Pune Police | ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल डीसीपींनी सर्व काही स्पष्टच सांगितलं; IPS प्रियांका नारनवरे म्हणाल्या – ‘काही वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली….’ (ऑडिओ क्लिप)

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक बातम्या, हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश