Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 832 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत काहींसा चढ-उतार पहायला मिळत आहे. राज्यात रविवारी (दि.28) 832 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.70 टक्के इतके झाले आहे.

 

राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 941 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के असून हा दर मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे. (Coronavirus in Maharashtra) सध्या राज्यात 8 हजार 193 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active Patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 53 लाख 57 हजार 358 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 34 हजार 444 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे. सध्या राज्यात 85 हजार 874 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत. तर 1043 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 832 new corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai-Pune Highway | पोलिस प्रशासनाचा मोठा निर्णय ! जुना मुंबई-पुणे, नाशिक, सातारा महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत बंद

Jalgaon Crime | धक्कादायक ! सासू अन् सासर्‍याच्या छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Pune Crime | चॉकलेटच्या आमिषानं 4 वर्षाच्या मुलीवर 12 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार