Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 848 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 848 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून आले आहे. तर, 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 974 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त (Coronavirus in Maharashtra) झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.68 टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात सध्या 9 हजार 187 रुग्ण सक्रीय (Active Patient) आहेत.

 

राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्क्यांवर स्थिरावला आहे.
राज्यात आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 1 लाख 40 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 50 लाख 47 हजार 491 जणांची कोरोना चाचणी (Corona test) करण्यात आली आहे.
त्यापैकी 66 लाख 33 हजार 105 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यात सध्या 90 हजार 538 जण होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत.
तर 1 हजार 065 रुग्ण वैद्यकीय संस्थेत (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

दरम्यान, राज्याने आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात (Vaccination) आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. राज्यात 11 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ट्विटद्वारे दिली आहे. तसेच राज्यात 9 नोव्हेंबर रोजी 10 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते.
तेव्हापासून राज्यात एक कोटींवर नागरिकांना लस देण्याचे काम झाले आहे. यामध्ये ओराग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो, असे देखील टोपे म्हणाले.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 848 new corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IND Vs NZ Test Series | कानपूर कसोटीवर वसीम जाफरचे ‘ते’ ट्विट तुफान व्हायरल

World Top Business Family | जाणून घ्या अमेरिकेच्या वॉल्टन कुटुंबाने कशी केली होती ‘गडगंज’ संपत्तीची ‘वाटणी’, तसंच करायचंय रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना!

HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई इथे भरती; पगार 1,31,000 रुपयापर्यंत, जाणून घ्या