Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,000 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra |राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी (state Patient growth) झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आज 5,756 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,000 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 03 हजार 486 इतकी आहे. याच दरम्यान राज्यात 180 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Coronavirus in Maharashtra | 9,000 new corona patients in the last 24 hours in the state

राज्यात आजपर्यंत 62 लाख 14 हजार 190 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 59 लाख 80 हजार 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.24 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.04 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 05 लाख 67 हजार 585 लोक होम क्वारंटाईनमध्ये Home quarantine आहेत. तर 4 हजार 066 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 364 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 331 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 236 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 483884.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2954.
– एकूण मृत्यू – 8690.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 472240.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7058.

पिंपरी चिंचवडमधील (PCMC) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 228 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 262 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या २४ तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 262207.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 1154.
– एकूण मृत्यू – 4320.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 256733.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4648.

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.36 %

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 70 हजार 285 रुग्णांपैकी 10 लाख 42 हजार 43 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 10 हजार 176 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.36 टक्के आहे.

हे देखील वाचा

Pune-Solapur Hutatma Express | …म्हणून 19 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस रद्द

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Coronavirus in Maharashtra | 9,000 new corona patients in the last 24 hours in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update