Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,195 नवीन रुग्ण, तर 8,634 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची (Corona-infected patient) संख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात आज 9 हजार 195 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 8 हजार 634 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 58 लाख 28 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.01 टक्क्यावर गेला आहे.

राज्यात आज 252 रुग्णांच्या मृत्यूची (Deaths) नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 18 लाख 75 हजार 217 प्रयोगशाळा (Laboratory Test) नमुन्यांपैकी 60 लाख 70 हजार 599 नमुने पॉझिटिव्ह (positive patient) आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 285 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 4 हजार 339 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 286 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 133 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 13 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 07.
– 286 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 478803.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2704.
– एकूण मृत्यू – 8594.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 467505.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6484.

 

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 265 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 171 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 258053.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1460.
– एकूण मृत्यू – 4288.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 252305.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5488.

Web Titel :- Coronavirus in Maharashtra | 9,195 new corona patients in the last 24 hours in the state

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल