Advt.

Coronavirus in Maharashtra | मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर ! औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये रुग्णसंख्येची आकडेवारी वाढली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या विषाणूने (Coronavirus in Maharashtra) कहर केला आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरात दैनंदिन कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्याला चिंता लागली आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. परंतु, काल (बुधवारी) कोरोना रूग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. 24 तासात शहरात तब्बल 410 रुग्ण सापडले आहे. याचबरोबर आणखी काही शहरातही कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे.

औरंगाबाद शहर मधील दर शंभर रुग्णांमागे 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून येत आहेत. तसेच, मराठवाड्यातील लातूर (Latur) आणि नांदेडमधील (Nanded) कोरोना रुग्णांची आकडेवारीही 400 च्या घरात पोहोचल्याचं दिसत आहे. नांदेडमध्ये काल (बुधवारी) 474 नवे कोरोना बाधित सापडले. यामध्ये महापालिका हद्दीत 346 रुग्ण सापडले आहे. नांदेड जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण, बाधितांना सौम्य लक्षणे असल्याने रूग्णालयात भरतीप्रक्रिया कमी आहे. (Coronavirus in Maharashtra)

लातूर जिल्ह्यात देखील कोरोना संसंर्ग फैलावत असल्याचं दिसत आहे. याठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 15.6 वर पोहोचला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यात बुधवारी 97 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. परभणी (Parbhani) जिल्ह्यात बुधवारी 73 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 2.33 असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Aanchal Goyal) यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात बुधवारी 22 रुग्ण सापडले. बीड (Beed) जिल्ह्यात 38 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक असली तरी देखील रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे, ही बाब सकारात्मक आहे.
त्याचबरोबर सर्वात मोठा दिलासा म्हणजे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या कमी असून घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा तुलनेने अधिक आहे.
रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता मोठ्या प्रमाणात केली असली तरी शिल्लक बेडच अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते.

Web Title : Coronavirus in Maharashtra | aurangabad Latur and Nanded marathwada corona news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात