Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,370 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (मंगळवार) कालच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. तर दैनंदिन मृत्यूची संख्या कमी झाली आहे. राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. आज राज्यात 1 हजार 201 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 370 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 38 लाख 395 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.48 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 32 कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 060 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 22 हजार 981 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 20 लाख 80 हजार 203 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 05 लाख 051 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 76 हजार 191 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 961 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! 1,370 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्यात झाली घसरण, मिळतंय 9000 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची खास भेट ! ऑक्टोबरच्या पगारात मिळणार ‘हे’ 3 भत्ते, जाणून घ्या किती मिळेल पगार