Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,519 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) घट होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या वाढली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 1 हजार 193 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 519 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 55 लाख 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.6 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 39 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 313 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 15 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 29 लाख 47 हजार 355 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 14 हजार 158 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 1 लाख 87 हजार 286 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 895 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! 1,519 patients ‘corona free’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | अखेर परमबीर सिंग ‘अवतरले’, अनिल देशमुखांबद्दल केला ‘हा’ मोठा खुलासा

Modi Government | मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना दिवाळी भेट ! इंधनावरील टॅक्स घटवला, पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी ‘स्वस्त’

Nawab Malik | ‘भंगारवाला असल्याचा मला अभिमान’, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या