Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,520 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 1 हजार 410 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 520 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 35 लाख 439 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील (Coronavirus in Maharashtra) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.46 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 18 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 016 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 23 हजार 894 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 18 लाख 93 हजार 695 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 02 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 401 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 903 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Comfortable! 1,520 corona-free in the last 24 hours in the state, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे पोलिसांकडून वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणात दोघांना अटक (व्हिडीओ)

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 63 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

MP Sanjay Patil | ‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’, हर्षवर्धन पाटलांनंतर ‘या’ पाटलांचे वक्तव्य