Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,976 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या जवळपास आली आहे. आजही राज्यात 1 हजार 094 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 976 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 लाख 932 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.64 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 447 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु  (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 35 लाख 22 हजार 546 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 20 हजार 423 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 29 हजार 714 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 870 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! 1,976 corona-free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | थर्ड पार्टी इन्स्पेक्शननंतरही मनपाच्या खरेदी आणि कामांत भ्रष्टाचार ! सल्लागार संस्थांची बिले देण्यापुर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे बंधन; आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून ‘चाप’

Indian Railways | राज्यातील मुखेड, नांदेड, पुर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मलकापुरमधून धावणार ‘ही’ नवी सुपरफास्ट रेल्वे 

ST Workers Agitation | पुणे जिल्ह्यात 26 एसटी कर्मचारी निलंबित; राज्यात 918 Suspended