Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 7,510 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात दैनंदिन कोरोना (coronavirus in maharashtra) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 7 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात आज 6,910 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7,510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 60 लाख 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण (coronavirus in maharashtra) बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.33 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 147 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.09 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 94 हजार 593 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 58 लाख 46 हजार 165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 29 हजार 596 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 60 हजार 354 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 3,977 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 276 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 310 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात कोरोना बाधित 12 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 06.

– 229 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 484356.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2815.

– एकूण मृत्यू – 8702.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 472839.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7178.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 227 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 224 रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 01 जणांचा मृत्यू

– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 262613.

– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1112.

– एकूण मृत्यू – 4322.

– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 251790.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 3905

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! 7,510 corona-free in the last 24 hours in the state, find out other statistics

Pune Crime | दुचाकी आणि जबरी चोरी करणार्‍या दोघांना अटक, 3 दुचाकीसह दोन लाखाचा माल गुन्हे शाखेकडून जप्त

Supreme Court | मोदी सरकारला झटका ! सहकाराचा विषय राज्यांकडेच, SC कडून ‘ती’ घटनादुरुस्ती रद्द

Indian Railways | यात्रीगन कृपया ध्यान दें ! आता स्लीपरच्या खर्चात घ्या AC इकॉनॉमी क्लासचा आनंद, ‘या’ पध्दतीची असेल व्यवस्था; जाणून घ्या