Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,293 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) घट होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढत आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 982 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 293 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 61 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.62 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 430 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

 

सध्या राज्यात 13 हजार 311 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात (Coronavirus in Maharashtra) आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 33 लाख 99 हजार 355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 19 हजार 329 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 33 हजार 262 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 867 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Comfortable! In the last 24 hours, 1,293 patients in the state have been ‘corona free’, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा