Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,943 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (शुक्रवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 2 हजार 620 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 943 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 63 लाख 97 लाख 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.32 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 59 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 470 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 33 हजार 011 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 99 लाख 14 हजार 679 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 73 हजार 092 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 972 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,050 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :  Coronavirus in Maharashtra | Comfortable! In the last 24 hours 2,943 patients in the state have been ‘corona free’, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rakesh Jhunjhunwala | बिगबुलने ‘या’ कंपनीत कमी केली 10% भागीदारी, केवळ 2 दिवसात विकले 8.5 लाख शेयर

Cheapest Home Loan Rate | खुशखबर ! ‘या’ 10 बँका देताहेत सणासुदीच्या काळात ‘स्वस्त’ गृहकर्ज, जाणून घ्या कुणाची ऑफर सर्वात स्वस्त

Pune News | नवरात्रीनिमित्त महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन, 210 महिलांची तपासणी