Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,112 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन राज्यात कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या वाढत आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 1 हजार 418 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 112 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 45 लाख 454 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.54 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 134 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 18 हजार 748 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 23 लाख 16 हजार 910 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 07 हजार 954 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 71 हजार 200 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 896 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! In the last 24 hours in the state 2,112 patients ‘corona’ free, learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vicky Kaushal – Katrina Kaif | राजस्थानच्या ‘या’ शानदार रिसॉर्टमध्ये ‘सातफेरे’ घेणार विक्की आणि कतरीना? शॉपिंग करताना दिसली आई आणि बहिण

MSRTC Employees Strike | राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मागे, परिवहन मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती (व्हिडीओ)

Nawab Malik | आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया; म्हणाले -‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ (व्हिडीओ)