Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्यात नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून दररोज मोठी घट होताना पाहायला मिळत आहे. तसेच मृत्यूसंख्याही कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 436 नव्या रुग्णांचे (Coronavirus in Maharashtra) निदान झाले आहे. तर राज्यात 18 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन (Discharge) घरी गेले आहेत. आज राज्यात नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तिप्पट आहे. रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी होत आहे.

 

राज्यात आज 18 हजार 423 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 75 लाख 57 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.76 टक्के झाले आहे. राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 098 इतकी आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 56 लाख 55 हजार 012 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 10 हजार 136 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 1 लाख 06 हजार 059 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 6 लाख 73 हजार 875 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2383 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Comfortable ! Significant decline in the number of new corona patients in the state, know the statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्यांचे हात-पाय तोडा, 2-4 महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता’

 

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात पुण्याच्या क्वॉर्टर गेट परिसरातून एकाला अटक

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळेल डबल बोनांझा ! सॅलरी वाढण्यासह होतील ‘या’ मोठ्या घोषणा; जाणून घ्या