Coronavirus in Maharashtra | मृतांच्या संख्येने वाढवली चिंता, राज्यात गेल्या 24 तासात 1,020 ‘कोरोना’मुक्त; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. मात्र दैनंदिन मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 999 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 020 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 66 लाख 913 रुग्णांनी कोरोनावर मात (Coronavirus in Maharashtra) केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.64 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 565 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 12 हजार 219 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 38 लाख 63 हजार 284 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 23 हजार 344 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 19 हजार 432 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1028 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Concern over death toll rises to 1,020 ‘corona’ in state in last 24 hours; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Karthiki Yatra | पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या नव्या 7 गाड्या धावणार

Tripura violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात; अमरावतीत 144 कलम लागू

MP Sujay Vikhe Patil | ‘पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको’ – खा. सुजय विखे