Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 11,877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 11 हजार 877 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संख्येत मठी वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. राज्यात आज 50 नवीन रुग्ण आढळून आले आहे. ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात आजपर्यंत 510 ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 65 लाख 12 हजार 610 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.11 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 6 कोटी 92 लाख 59 हजार 618 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 99 हजार 868 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.67 टक्के आहे. सध्या 42 हजार 024 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 2 लाख 43 हजार 250 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1091 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 11,877 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Housing Sales Report | 2021 मध्ये पुण्यासह देशातील ‘या’ 7 टॉप शहरांत घरांची विक्री 71% वाढली, पुण्यात 53 % वाढ; ‘एनारॉक’च्या रिपोर्टमध्ये दावा

 

Palghar Crime | आश्रम शाळेतील 12 वर्षाच्या मुलीला कामास बोलावून अधीक्षकाचं विकृत कृत्य, महिला कर्मचाऱ्याने पाहिलं अन्…

 

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

 

Whatsapp Account Ban | खबरदार ! ‘ही’ चूक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट होईल बॅन, नोव्हेंबरमध्ये 17.5 लाख अकाउंट झालेत BAN, जाणून घ्या सविस्तर

 

Nashik News | धक्कादायक! नाशिकमध्ये होतोय चालता बोलता नागरिकांचा मृत्यू, एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू: शहरात खळबळ