Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 13,840 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात काल नव्या कोरोना बाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 15 हजार 252 होती. तर आज रुग्ण संख्या दीड हजारांनी कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 13 हजार 840 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली नाही.

 

 

राज्यात आज 27 हजार 891 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 74 लाख 91 हजार 759 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.26 टक्के झाले आहे. राज्यात आज 81 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 940 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 52 लाख 54 हजार 877 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 77 लाख 82 हजार 640 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 1 लाख 44 हजार 011 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 08 लाख 52 हजार 419 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 13,840 new patients in the state in the last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 ‘बोगस’ कर्मचारी ‘बडतर्फ’; सर्वाधिक बोगस भरती बावधन बु. आणि नर्‍हे ग्राम पंचायतीमध्ये झाल्याचे उघड

 

Urfi Javed Family | उर्फी जावेद सारख्याच सुंदर आहेत तिच्या बहिणी, इंन्टाग्रामवर फोटो शेअर करून फॅमिलीची करून दिली ओळख

 

Pune Smart City Project | स्मार्ट सिटीच्या बेफिकिरी मुळे नागरिकांना भुर्दंड! सत्ताधारी भाजप नगरसेविकेचा घरचा आहेर