
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1426 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1426 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली. तर 776 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील तीन चार दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या पुढे येत आहे. राज्यात रुग्ण वाढत असताना ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याचे चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात गेल्या 24 तासात 776 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 65 लाख 3 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.66 टक्के इतके झाले आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने सक्रिय रुग्णांच्या (Active Patient) संख्येत वाढ होत आहे.
राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 10 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 91 हजार 464 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. राज्यात आजपर्यंत 6 कोटी 85 लाख 49 हजार 133 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 66 लाख 59 हजार 314 जणांना कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) लागण झाली आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 1,426
*⃣Recoveries – 776
*⃣Deaths – 21
*⃣Active Cases – 10,441
*⃣Total Cases till date – 66,59,314
*⃣Total Recoveries till date – 65,03,733
*⃣Total Deaths till date – 1,41,454
*⃣Tests till date – 6,85,49,133(3/6)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) December 27, 2021
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 1426 new patients in state in last 24 hours, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BJP MLA Nitesh Rane | शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; उद्या न्यायालयात सुनावणी
BJP MLA Nitesh Rane | शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; उद्या न्यायालयात सुनावणी